गणेशोत्सव 2024

Ambernath : अंबरनाथमध्ये गणपती बाप्पाच्या मोदकाचा 2 लाख 22 हजारांना लिलाव

अंबरनाथमध्ये गणपती बाप्पासमोरील मोदकाचा तब्बल २ लाख २२ हजार रुपयांना लिलाव करण्यात आला आहे.

Published by : Siddhi Naringrekar

किरण तेलगोटे, अंबरनाथ

अंबरनाथमध्ये गणपती बाप्पासमोरील मोदकाचा तब्बल 2 लाख 22 हजार रुपयांना लिलाव करण्यात आला आहे. खाटूश्याम मित्र मंडळाकडून करण्यात आलेल्या या लिलावात अंबरनाथचे आमदार डॉ. बालाजी किणीकर यांच्या पत्नी डॉ. शिल्पा किणीकर यांनी सर्वाधिक बोली लावत हा मोदक खरेदी केला.

खाटूश्याम मित्र मंडळाकडून बाप्पासमोर ठेवलेल्या महामोदकाचा विसर्जनाच्या दिवशी लिलाव करण्याची प्रथा आहे. या लिलावात आज 67 हजार रुपयांपासून बोली सुरू करण्यात आली.

यावेळी अंबरनाथचे आमदार डॉ. बालाजी किणीकर यांच्या कुटुंबीयांनी लिलावात सहभाग घेतला. सर्वाधिक 2 लाख 22 हजार रुपयांची बोली लावत हा मोदक खरेदी केला.

यानंतर आमदार साहेबांना आत्तापर्यंत ३ वेळा अंबरनाथकरांनी आशीर्वाद दिला असून यंदाही बाप्पाच्या आशीर्वादाने ते चौथ्यांदा निवडून येतील, असा विश्वास आमदार किणीकर यांच्या पत्नी डॉ. शिल्पा बालाजी किणीकर यांनी व्यक्त केला.

Dharmarao Baba Atram Aheri Assembly Election 2024: महाराष्ट्रात पहिल्यांदाच बाप-लेकीत रंगणार विधानसभेची चुरस

Sanjay Bansode Udgir Vidhan Sabha constituency: संजय बनसोडेंसमोर पवार गटाच्या सुधाकर भालेरावांचं आव्हान

राज ठाकरे बॅकफूटवर? शिवाजी पार्क ठाकरेंना की शिंदेना?

Raj Thackeray MNS Manifesto; 'आम्ही हे करु' नावाने मनसेचा जाहीरनामा प्रसिद्ध; जाहीरनाम्यात काय?

'आम्ही हे करु' नावाने मनसेचा जाहीरनामा प्रसिद्ध